अभंग ; ऎशा सकळ कळा जाणसी । नंदरायाचा कुमर म्हणविसी । बापरखुमादेविवर विठ्ठलीं भेटी । पडलि ते न सुटे जिवेंसी ॥६॥ *
अभंग तापत्रयीं तापलीं गुरुतें गिवसिती भगवे देखोनि म्हणती तारा स्वामी । तंव ते नेणोनि उपदेशाची रीती आना न उपदेशिती ठकलें निश्र्चिती तैसें जालें ॥१॥ संत ते कोण संत ते कोण । हे जाणवि खुण केशवराज ॥२॥ कोण्ही एक प्राणी क्षुधेनें पिडिले । म्हणोनि दोडे तोंडूं गेले । खावों बैसे तो नुसधि रुपी उडे । ठकलें बापुडें तैसें झालें ॥३॥ कोण्ही एक प्राणी प्रवासें पीडिला । स्नेहाळु देखिला बिबवा तो । तयाचें स्नेहलावितां अंगी । सुजला सर्वांगीं तैसें जालें ॥४॥ कोण्ही एक प्राणी पीडीला झडीं । म्हणोनि गेला पैल तो झाडी । खा खात अस्वली उठली लवडसवडीं । नाक कान तोडी तैसें झालें ॥५॥ ऎशा सकळ कळा जाणसी । नंदरायाचा कुमर म्हणविसी । बापरखुमादेविवर विठ्ठलीं भेटी । पडलि ते न सुटे जिवेंसी ॥६॥ * मलयानिळ शीतळु पालवी नये गाळूं । सुमनाचा परिमळु गुंफ़ितां नये ॥१॥ तैसा जाणा सर्वेश्वरु म्हणों नये साना थोरु । याच्या स्वरुपाचा निर्धारु कवण जाणें ॥२॥ मोतियाचें पाणी भरतां नये वो रांजणीं । गगनासीं गवसणी घालितां नये ॥३॥ कापुराचें कांडण काढितां नये आड कण । साखरेचें गोडपण । पाखडतां नये ॥४॥ डोळियांतील बाहुली करु नये वो वेगळी । स...