अभंगः श्री अनंता मधुसूदना|पद्मनाभा नारायणा| जगव्यापका जनार्दना|आनंदघना अविनाशा || 1 ||

श्री अनंता मधुसूदना|पद्मनाभा नारायणा|

जगव्यापका जनार्दना|आनंदघना अविनाशा || 1 ||

सकल देवाधिदेवा|कृपाळुवा जी केशवा|
महानंदा महानुभवा| सदाशिवा सहजरूपा || धृ ||

चक्रधरा विश्वम्भरा|गरुडध्वजा करुणाकरा |
सहस्त्रपादा सहस्त्रकरा| क्षीरसागरा शेषशयना || 2 ||

कमलनयना कमलापती| कामिनीमोहना मदनमूर्ती|
भवतारका धरी त्या क्षिती| वामनमूर्ती त्रिविक्रमा || 3 ||

अगा ये सगुणा निर्गुणा|जगज्जनित्या जगज्जीवना |
वासुदेव देवकी नंदना| बाळरांगणा बाळकृष्णा || 4 ||

तुका आला लोटांगणी|मज ठाव द्यावा जी चरणी |
हेची करीतसे विनवणी| भवबंधनी सोडवावे || 5 ||

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

तुकाराम महाराजांनी नित्यपाठासाठी स्वार्गाहून पाठविलेले अभंग

ज्ञानदेवें उपदेश करुनिया पाही । सोपान मुक्ताई बोधियेली ॥१॥ मुक्ताईनें बोध खेचरासीं केला । तेणें नामियास बोधियलें ॥२॥ नाम्याचें कुटुंब चांगा वटेश्‍वर । एका जनार्दनीं विस्तार मुक्ताईचा

अभंग ; ऎशा सकळ कळा जाणसी । नंदरायाचा कुमर म्हणविसी । बापरखुमादेविवर विठ्ठलीं भेटी । पडलि ते न सुटे जिवेंसी ॥६॥ *