भजन - ज्ञानेश्‍वर माउली ज्ञानराज माउली तुकाराम ।

भजन - ज्ञानेश्‍वर माउली ज्ञानराज 


माउली तुकाराम ।





हेंचि दान देगा देवा । तुझ्या विसर न व्हावा ॥१॥

गुण गाईन आवडी । हेंचि माझी सर्व जोडी ॥२॥
न लगे मुक्ति आणि सम्पदा । सन्त संग देई सदा ॥३॥
तुका म्हणे गर्भवासी । सुखे घालावें आम्हांसी ॥४॥
*
भजन - जय विठ्ठल जयजय विठ्ठल ।
बोलिलीं लेंकुरें । वेडी वाकुडीं उत्तरें ॥१॥
करा क्षमा अपराध । महाराज तुम्ही सिद्ध ॥२॥
नाहीं विचारिला । अधिकार म्यां आपुला॥३॥
तुका म्हणें ज्ञानेश्‍वरा । राखा पायां पैं किंकरा ॥४॥
*
भजन - ज्ञानदेव तुकाराम ।
झालें समाधान । तुमचे देखिले चरण ॥१॥
आतां उठावेसे मना । येत नाहीं नारायणा ॥२॥
सुरवाडिकपणें । येथें सांपडलें केणें ॥३॥
तुका म्हणॆ भोग । गेला निवारला लाग ॥४॥

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

तुकाराम महाराजांनी नित्यपाठासाठी स्वार्गाहून पाठविलेले अभंग

काकड आरतीचे अभंग उठा उठा हो साधुसंत । साधा आपुले हित । गेला गेला हा नरदेह । मग कैचा भगवंत ॥ १

अभंग ; ऎशा सकळ कळा जाणसी । नंदरायाचा कुमर म्हणविसी । बापरखुमादेविवर विठ्ठलीं भेटी । पडलि ते न सुटे जिवेंसी ॥६॥ *